खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग चढला आहे. प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झाला असून, उच्चशिक्षित – सुसंस्कृत उमेदवाराला पहिली पसंती मिळत आहे. बदलत्या वातावरणात सोबत आता लोकभावनाही बदलली आहे.
प्रभाग क्रमांक २० मध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या प्रतीक्षाताई सोनवणे यांना वाढता पाठिंबा पाहता आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रतीक्षाताई सोनवणे यांना महापालिकेत आपल्या हक्काचा नगरसेवक म्हणून पाठवण्यासाठी नागरीक स्वतः प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत.

लोक मताच्या तुलनेत पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी आता वाढू लागली आहे. सौ. प्रतीक्षाताई सोनवणे यांचा दांडगा संपर्क असल्याने त्यांना विजयाची पक्की खात्री आहे. जनविश्वासाची ही भक्कम साथ त्यांना अजून बळ देत असून त्यांना जनतेतून प्रभागातील समस्याही सांगितल्या जात आहेत.
प्रभाग समस्यामुक्त करण्यासाठी, कामाचा विशेष दर्जा टिकवून ठेवण्यासाठी, आणि विश्वासाने नागरिकांच्या रात्री – अपरात्री अडचणी सोडवण्यासाठी उभ्या असलेल्या महिला उमेदवार सौ. प्रतीक्षाताई यांच्या नावाची प्रभाग क्रमांक २० मध्ये जोरदार चर्चा असून नागरिक प्रतीक्षाताईंना पुष्पहार घालत निरंजनी ओवाळत आहेत. उमेदवार सौ प्रतीक्षाताई यांचे पती सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा सोनवणे यांची भक्कम साथ असल्याने प्रचार जोरात सुरू आहे.


