एआयएमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन औवेसी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळेस त्यांनी खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे.यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.
https://twitter.com/imAkbarOwaisi/status/1524690695004450816?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524690695004450816%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
अकबरुद्दीन औवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि भाजपनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं, “मुस्लिम लोक औरंगजेबाच्या कबरीवर जात नाही. कारण औरंगजेब दुष्ट होता. मुस्लिम आणि हिंदू समाजाला त्याने त्रास दिला. संभाजी महाराजांनाही त्रास दिला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

