• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मालगावच्या माय-लेकीने उचलले टोकाचं पाऊल, घरातील किरकोळ वादातून कृष्णा नदीत उडी घेऊन संपविले जीवन..!

Admin by Admin
June 28, 2025
in क्राईम
1 min read
0
मालगावच्या माय-लेकीने उचलले टोकाचं पाऊल, घरातील किरकोळ वादातून कृष्णा नदीत उडी घेऊन संपविले जीवन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मालगाव (ता. मिरज) येथून बेपत्ता झालेल्या माय-लेकीने कृष्णा नदीत उडी घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. घरातील किरकोळ वादातून दोघींनी टोकाचे पाऊल उचलले. आईचा मृतदेह म्हैसाळ येथील बंधार्‍याजवळ तर मुलीचा मृतदेह रायबाग येथे नदीपात्रात सापडले.

दीपाली अमित खांडेकर (वय 35) आणि प्राची अमित खांडेकर (वय 16) अशी मायलेकींची नावे आहे.

घरात किरकोळ वाद झाल्यानंतर मायलेकी रविवार दि. 15 जून रोजी घरातून निघून गेल्या होत्या. याबाबत नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. ग्रामीण पोलिसांनी तातडीने दोघींचा शोध सुरू केला. मिरजेत कृष्णाघाट परिसरात सीसीटीव्हीत दोघी दिसल्या. पोलिसांनी रेस्क्यू फोर्सच्या मदतीने कृष्णा नदीत शोध मोहीम राबविली. मात्र दोघी सापडल्या नाहीत. अखेर शोध थांबविण्यात आला. दरम्यान 20 जूनरोजी प्राची खांडेकर हिचा मृतदेह कर्नाटकातील रायबाग येथे कृष्णा नदीपात्रात मिळाला. रायबाग पोलिसांनी तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला. पण नातेवाईक न मिळाल्याने पोलिसांनी रायबागमध्येच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर गुरुवारी म्हैसाळ बंधारा केदारनाथ मंदिर येथे कृष्णा नदीपात्रात दीपाली खांडेकर यांचा मृतदेह आढळला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघींनी मिरजेत कृष्णाघाट येथून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Previous Post

सांगली पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

ब्रेकिंग | हेल्मेट नसल्याने सांगलीच्या तरुणाला पोलिसांनी केली बेदम मारहाण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | हेल्मेट नसल्याने सांगलीच्या तरुणाला पोलिसांनी केली बेदम मारहाण..!

ब्रेकिंग | हेल्मेट नसल्याने सांगलीच्या तरुणाला पोलिसांनी केली बेदम मारहाण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group