• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

Admin by Admin
June 4, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची गुरुवारी, पाच जूनरोजी दुपारी बैठक होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, की पुन्हा काँग्रेसमध्येच ते काम करणार, याची उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी जयश्री पाटील यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले. सध्या त्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेसह मिरज तालुक्यात मदनभाऊ गटाला सोबत घेण्यासाठी विविध राजकीय पक्षही उत्सुक आहेत. महापालिकेत या गटाचे 25 नगरसेवक आहेत. त्यामुळे पाटील यांच्या निर्णयाचा राजकीय परिणामही दिसून येणार आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्रीमती पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत काय शिजले ते गुरुवारच्या बैठकीत कळेल, असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे.

श्रीमती पाटील अजितदादा गटात प्रवेश करतील, अशी अटकळ आहे. याशिवाय भाजपचाही पर्याय त्यांच्यासमोर आहे. जयश्री पाटील यांना काँग्रेसमध्येच थांबविण्यासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम प्रयत्नशील आहेत. पक्षाने निलंबित केली असतानाही मध्यंतरी पालिका निवडणुकीबाबत कदम यांनी जयश्री पाटील यांच्याशीच चर्चा केली होती. त्यामुळे पाटील नेमका काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

Next Post

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group