• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीमध्ये गुंडाची दादागिरी, हॉटेलमध्ये राडा घातला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Admin by Admin
May 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीमध्ये गुंडाची दादागिरी, हॉटेलमध्ये राडा घातला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये गुंडाकडून सोमवारी रात्री धुडगुस घातला. हत्यारे नाचवत गुंडानी दहशत माजविली. हॉटेलमधील वेटर, कर्मचार्‍यांना शस्त्रांचा धाक दाखविला.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. संशयित गुंड संजयनगर परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संशयिताचे नावे पोलिसांनी शोधली असून त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम हॉटेलमध्ये(Hotel) रात्री गुंड शिरले. त्यांनी बसण्यास जागा देण्यास सांगितले. पण, आतमध्ये जागा नसल्याने वेटरने हॉलमध्ये बसण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने गुंडांनी आम्ही कोण हे ओळखत नाहीस, त्यामुळे असे बोलतोस असे म्हणत धक्का दिला.

त्यानंतर दारू आणि पाण्याची बाटली मागितली. पाण्याच्या बाटलीवरून गुंडांनी पुन्हा वेटरशी वाद घातला. त्यानंतर संशयितांनी हत्यार काढून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरवात केली. वेटरने लोखंडी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता ते शटर त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धारदार शस्त्रे नाचवत धुडगुस घातला.

हॉटेलचे काऊंटर, फ्रिज, भिंती, टेबलावर शस्त्राने वार करून नुकसान केले. त्यानंतर ते चारचाकीतून निघून गेले. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल (Viral)झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयिताचे नावे निष्पन्न केले आहेत. त्यांना लवकरच ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टीप: सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Previous Post

फेरफार नोंदणीसाठी लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह दोघांविरोधात ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची कार्यवाही

Next Post

भावाने भावाची सहा लाखांची सुपारी देऊन केला खून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भावाने भावाची सहा लाखांची सुपारी देऊन केला खून

भावाने भावाची सहा लाखांची सुपारी देऊन केला खून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group