• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | प्रशासन अलर्ट मोडवर, पूर आल्यास यंत्रणा सज्ज – आयुक्त सत्यम गांधी.

सांगली, मिरजेतील पूर क्षेत्राची पाहणी करताना आयुक्त सत्यम गांधी,बाजूस अन्य अधिकारी.

Admin by Admin
May 26, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | प्रशासन अलर्ट मोडवर, पूर आल्यास यंत्रणा सज्ज – आयुक्त सत्यम गांधी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सांगली, मिरजेत संभाव्य पूर क्षेत्राची पाहणी

  • निवारा केंद्राबाबतही नियोजन

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पावसाची सातत्याने संततधार सुरू असल्याने महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली, मिरजेतील संभाव्य पूरक्षेत्राची पाहणी केली. तेथील परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास महापालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती आयुक्त गांधी यांनी यावेळी बोलताना दिली.

गेल्या सहा- सात दिवसांपासून महापालिका क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. याशिवाय कोयना, वारणा (चांदोली धरण) क्षेत्र परिसरात ही पाऊस सुरू आहे. परिणामी सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. नालेसफाईचे काम गतीने सुरू आहेच. पण याशिवाय संभाव्य पूर स्थिती लक्षात घेत प्रशासनाने अन्य उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.


सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली, मिरज शहरातील संभाव्य पुरक्षेत्राची पाहणी केली. सांगलीत सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, कर्नाळ बायपास रोड तसेच पूर बाधित होणाऱ्या कुटुंबाना स्थळंतरीत करण्यात येणाऱ्या निवारा केंद्राची पाहणी केली. सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब, शाळा नंबर १७, रोटरी क्लब विश्रामबाग इत्यादी भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर परिस्थिती उपयोजनेबाबत सूचना करण्यात आलेले आहेत.

मिरज येथील कृष्णा घाट परिसर मिरज हायस्कूल इत्यादी परिसराची त्यांनी पाहणी केली. कृष्णा घाट परिसरातील विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी करावे लागणार उपाय योजना बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सहदेव कावडे, नकुल जकाते, सचिन सागावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुरणे, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, डॉ. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याच्या मुलावर शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Next Post

मोठी बातमी | सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेणार, पुरोगामी संघटनांचा निर्णय

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेणार, पुरोगामी संघटनांचा निर्णय

मोठी बातमी | सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेणार, पुरोगामी संघटनांचा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group