
मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज पूर्व भागातील काँग्रेसचे अमर पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे. अमर पाटील यांच्या प्रवेशाने मिरज तालुक्यासह विधानसभा क्षेत्र मतदारसंघात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

खासदार विशाल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयामध्ये काँग्रेस नेते अमर पाटील यांचे योगदान दखलपात्र आहे. काँग्रेसच्या ‘धीरे धीरे चलो’ अभियानाला आणि संघटनात्मक बांधणीला आळसपणा आला असल्याने अमर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अमर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. समित कदम यांची काम करण्याची पद्धत आणि कामातील उत्साहीपणा पाहून मिरज तालुक्यातील व शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील घटक जनसुराज्य शक्ती पक्षाला पसंती देत प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे.
बेडग गट प्रमुख अमरसिंह पाटील, ग्राम.पं.सदस्य कैलास पाटील,जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन शहाजी पाटील, बाळासाहेब उर्फ दत्तात्रय पाटील, सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक एन. जी पाटील ,अनिल ऊळागड्डे,बी.डी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर समित कदम यांनी शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात बेडग गावाच्या विकासाला सर्वोतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव करणे, डॉ पंकज म्हेत्रे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.