
कोल्हापुरात गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. काही गावगुंडांनी दारू पिऊन हॉटेलची तोडफोड केली. तसेच मॅनेजर आणि वेटरला देखील मारहाण केली. गावगुंडांनी घातलेला हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी गावगुंडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी गावगुंडांवर अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही.

कोल्हापूर सांगली या मार्गावरील अतिग्रे फाट्यावर सागरीका हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये रात्री नऊ ते साडेदहा वाजता काही गावगुंड आले. त्यांनी दारू प्यायली. नंतर गावगुंडांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. गावगुंडांनी हॉटेलची तोडफोड केली. तसेच त्यांनी दारूचे पैसेही दिलेले नाही. दारूच्या नशेत त्यांनी हॉटेलचे मॅनेजर आणि वेटरवर हल्ला केला. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गावगुंडांनी घातलेल्या हैदोसानंतर मॅनेजर आणि वेटरने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी गावगुंड दर आठवड्याला येऊन फुकट दारू पितात आणि हैदोस घालतात, अशीही तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी ओमकार शिंदे, आदित्य नावाच्या गावगुंडांसह इतर ८ गावगुंडांविरोधात गुन्हा दाखल केला.