
- मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शहरातील जिलेबी चौकातील एका सराफी दुकानातून पाच बुरखाधारी महिलांनी व एका पुरुषाने चार लाख रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बद्रिनारायण बळवंत कट्टी (वय ४२, रा.ब्राह्मणपुरी मिरज) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी कट्टी यांचे मिरजेतील शनिवार पेठ सराफ कट्टा येथे रामचंद्र व्यंकटेश कट्टी नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. दि. २७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास पाच बुरखाधारी महिला व एक पुरुष दागिने खरेदीसाठी दुकानात आले. त्यांनी ८० ग्रॅम वजनाचे ३५ नग सोन्याच्या रिंगा, बाली असे चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
