- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे. वकील, पक्षकार यांना मुंबई उच्च न्यायालयात कामानिमित्त हेलपाटे मारताना वेळ, पैसा यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

पक्षकार, वकील यांचा होणार त्रास कमी व्हावा. कामे वेळेत पुर्ण व्हावीत, म्हणून कोल्हापूर येथे खंडपीठ निर्माण व्हावे, म्हणून पंढरपूर अधिवक्ता संघ व खंडपीठ कृती समिती गेली चाळीस वर्ष आंदोलन, मार्चे काढून प्रयत्न करत आहे. मात्र, सरकार केवळ आश्वासन देत आहे. कृती करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर अधिवक्ता संघ व खंडपीठ कृती समितीच्यावतीने खंडपीठ निर्माण व्हावे म्हणून श्री विठ्ठलास साकडे घालून पंढरपूर ते कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर) रथ यात्रा दि. 4 एप्रिल पासून काढली जाणार आहे. या रथयात्रेचा दि. 6 रोजी कोल्हापुरात समारोप होणार आहे.

कोल्हापूर खंडपीठ निर्माण व्हावे, म्हणून पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथ यात्रा काढण्यात येणार आहे. या रथ रात्रेत पंढरपूर येथून श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडे घालून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी देवीला देखील साकडे घालून रथ यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याचे पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. राजेश चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. महेश कसबे, सचिव अभयसिंह देशमुख, अॅड. गणेश चव्हाण व संघाचे सदस्य उपस्थित होते.

अॅड. चौगूले म्हणाले की, पंढरपूर अधिवक्ता संघाच्यावतीने कोल्हापूर खंडपीठासाठी गेल्या 40 वर्षापासून लढा सुरु आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिधुदूर्ग असे सहा जिल्हे मिळून कोल्हापूर येथे खंडपीठ निर्माण व्हावे म्हणून लढा देत आहे. सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही, दखल घेत नाही. तसेच आम्ही वेगवेगळ्या मार्गानी आंदोलन केले होते. तेव्हा शासनाने आम्हाला खंडपीठ करु असा नुसताच शब्द दिला होता. आजपर्यंत सकारात्मक काहीही केलेले नाही. त्यामुळे पंढरपूर अधिवक्ता संघ, कोल्हापूर खंडपीठ कृती समिती यांनी पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथ यात्रा दि. 4 एप्रिल ते 6 एप्रिल या दरम्यान आयोजित केली आहे. या रथयात्रेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिधुदूर्ग या सहा जिल्ह्यातील अधिवक्ता संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पक्षकार सहभागी होणार आहेत.
पंढरपूर येथील रथ यात्रेच्या शुभारंभाला अधिवक्ता संघ, खंडपीठ कृती समिती व पक्षकार असे सुमारे एक हजाराहून अधिकजन सहभागी होणार आहेत.
- रथ यात्रेत तहसिलदारांना देणार निवेदन
पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथ यात्रा दि. 4 ते 6 एप्रिल दरम्यान सुरु होत आहे. या यात्रेत अधिवक्ता संघाचे पदाधिकारी, खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी आणि पक्षकार सहभागी होणार आहेत. रथ रात्रेच्या मार्गावर असलेल्या तालुक्याील तहसिल कार्यालयावर जावून निवेदन दिले जाणार आहे. तसेच तहसिलदार यांनाही रथ यात्रेत सामील करुन घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.