
- गडहिंग्लज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथे एका २५ वर्षीय तृतीयपंथीयावर अत्याचार केल्याची घटना घडली.
याप्रकरणी ओंकार चौगुले (रा. माले, ता. पन्हाळा) व भिकाजी पाटील (रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) या दोघांविरुद्ध पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तृतीय पंथीय व संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंगळवारी (ता. २५) रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान बुगडीकट्टी ते तेरणी जाणाऱ्या रोडवरील शेतात ओंकारने त्याच्यावर अत्याचार केले.
