
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनीच्या साडेसातीचं नाव ऐकताच सर्वांना भीती वाटते.

मात्र, शनीची साडेसाती म्हणजे नेमकं काय? साडेसातीचा काळ किती वर्षांचा असतो? आणि उद्यापासून म्हणजेच २९ मार्चपासून कोणत्या राशींवर शनीची साडेसाती सुरु होणार आहे? त्याचा राशींवर कसा परिणाम होणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

शनी हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. २०२५ वर्षात २९ मार्च रोजी म्हणजेच उद्या शनीचं राशी संक्रमण होणार आहे. या दिवशी शनी अमावस्या तसेच सूर्यग्रहणाचा देखील योग आहे. शनीच्या राशी संक्रमणाबरोबरच शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. या राशीत तब्बल अडीच वर्ष शनी महाराज स्थित असणार आहेत.
शनीची साडेसाती म्हणजे काय?
प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनीच्या साडेसातीचा काळ सात वर्षांचा असतो. तसेच, शनीने एका राशीत प्रवेश करताच हा काळ अडीच वर्षांचा असतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, शनी जेव्हा जेव्हा राशी संक्रमण करतात तेव्हा त्या राशीवर आणि त्याच्या पुढच्या मागच्या राशीवर साडेसातीचा प्रभाव पडतो. शनीच्या साडेसातीचे तीन चरण असतात.
‘या’ राशींवर असणार साडेसाती
नुकतंच होणाऱ्या शनीच्या राशी संक्रमणामुळे मेष राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरु होईल. तर, कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा चरण असेल आणि मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा तिसरा चरण असणार आहे.
- मेष रास (Aries Horoscope)
उद्यापासून होणाऱ्या शनीच्या राशी संक्रमणाने मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. हा काळ मेष राशीसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. किंवा तुमचं काम न झाल्यामुळे कोणाचा त्रागा करु नका. कारण अडीच वर्षांचा साडेसातीचा काळ असणार आहे. त्यामुळे कोणतेही शॉर्टकट्स वापरु नका.
- कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा असणार आहे. त्यामुळे कुंभ राशीने देखील ताक फुंकून प्यावं. तसेच, तुम्ही या अडीच वर्षांच्या काळात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका. तुम्हा आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, शुभ कार्यात देखील अडथळा येण्याची शक्यता आहे.
- मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा असणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना देखील थोड्याफार प्रमाणात साडेसातीची झळ भासणार आहे. हा काळ तुमच्यासाठी संकटाचा आहे. त्यामुळे नवीन नोकरी, शुभ कार्य आणि गुंतवणूक यांसारख्या कोणत्याच गोष्टी या काळात करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी ‘गोपनीय खबऱ्या’ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘गोपनीय खबऱ्या’ कोणताही दावा करत नाही.)