• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Admin by Admin
March 23, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवरही कारवाईची मागणी

  • कडेगांव प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

कडेगांव तालुक्यातील वडिये रायबाग येथील दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांवर एट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असून मारहाण होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी कोणतीच कारवाई झाली नसल्याने सदर महिलेला न्याय मिळत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश वाघमारे पीडित महिलेच्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटलं आहे की, वडीयेरायबाग, ता. कडेगाव, जि. सांगली. येथील विद्याश्री मासाळ या महिलेचे पती किरण सूर्यवंशी यांनी गावातील एका व्यक्तीकडून १० गुंठे जमिनीचा व्यवहार केला आहे. परंतु जमिनीचे मालक पैसे घेऊन सुद्धा जमिनीचा हक्क देण्यास तयार नाहीत. जमिनीचे खरेदी पत्र तयार करण्याकरिता मालकास फोन वरून तयार केले व कडेगाव येथील रजिस्टर कार्यालयामध्ये येण्यास सांगितले. रजिस्टर कार्यालयामध्ये खरेदी दस्त तयार झाला परंतु मालक स्वाक्षरीसाठी हजर झाले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी विद्याश्री मासाळ या मालकाच्या विटा येथील घरी गेली असता, जगमालक व त्याच्या कुटुंबीयांनी विद्याश्री मासाळ यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.विटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक २१/०१/२०२५ रोजी ही घटना घडली होती. संबंधित घटना घडून आता जवळपास २ महिने कालावधी होत आला आहे. तरी या प्रकरणाची पोलिसांनी अद्यापही कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही संबंधित हद्दीत घडलेले प्रकरण विटा येथे असल्यामुळे आम्ही विटा पोलीस स्टेशनमध्ये वारंवार जाऊन सुद्धा आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक सांगली यांना पत्रव्यवहार केला त्या पत्राची पोच चिंचणी पोलीस स्टेशन मध्ये आली.

चिंचणी पोलीसस्टेशनमध्ये आमचे जबाब नोंदवून घेतले पुढील तपासासाठी प्रकरण विटा पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले. विटा पोलीस स्टेशन जवळ २५ दिवसांपूर्वी आलेला प्रकरण असून अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. २५ दिवस झाले पीडित कुटुंबांना आम्ही तपास करत आहोत तपास पूर्ण झाला नाही आम्हाला या प्रकरणाचा अभ्यास करू या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून १०/०३/२०२५ रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. तरी पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनास परवानगी नाकारली.पोलीस प्रशासन दलित महिलेचा गुन्हा का दाखल करून घेत नाही? याची कारणे प्रशासनाने आम्हास लवकरात लवकर यावी. त्या दलित महिलेला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर २७/०३/२०२५ रोजी पीडित कुटुंब घेऊन मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे याची आपण नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित

Next Post

मोठी बातमी | जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण.? गोपीचंद पडळकरांनी सांगितला नवा डाव.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण.? गोपीचंद पडळकरांनी सांगितला नवा डाव.!

मोठी बातमी | जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण.? गोपीचंद पडळकरांनी सांगितला नवा डाव.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group