• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेत ‘या’ कारणावरून जोरदार राडा, दोन गटात तुफान हाणामारी : पोलिसांचा सौम्य लाठीमार..!

Admin by Admin
March 10, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेत ‘या’ कारणावरून जोरदार राडा, दोन गटात तुफान हाणामारी : पोलिसांचा सौम्य लाठीमार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या विजयानंतर देशभरात उत्साह अन् जल्लोष होता. महाराष्ट्रही मागे नव्हता. पुणे, मुंबई आणि सांगलीमध्ये चाहत्यांनी रस्त्यावर येत आपला आनंद साजरा केला.

पण सांगलीमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागले आहे. भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना सांगलीच्या मिरजेत दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. जल्लोषावेळी दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. अखेरीस पोलिसांनी मध्यरात्री गर्दीवर नियंत्रण मिळवत जमावाला पांगवले.

भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते. याचवेळी दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी भारताचा विजय साजरा करणाऱ्या तरुणांनी जल्लोष सुरू होता. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठी हातात घेऊन दोन्ही गटाला पांगवले.

रोहित शर्माच्या नेतृ्तवातील भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगली अन् मिरजेत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून दणदणीत विजय मिळवला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकामध्ये मिरजकारांनी जोरदार जल्लोष केा. फाटाके फोडत, घोषणाबाजी करत क्रिकेट प्रेमींनी आंनद व्यक्त केला. पण याच विजयी जल्लोष साजरा करताना दोन गटात बाचाबाची झाली. पोलिसांनी लाठी चार्ज करत जमावाला पांगवलं.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | बसचालक-वाहकाला बेदम मारहाण

Next Post

सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेचे बजेट जाणार १ हजार कोटींवर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेचे बजेट जाणार १ हजार कोटींवर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group