• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत लिंगायत, कक्कया समाज स्मशानभूमीचे सुशोभीकरण ; आ. नायकवडींच्या हस्ते उद्घाटन

Admin by Admin
March 1, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत लिंगायत, कक्कया समाज स्मशानभूमीचे सुशोभीकरण ; आ. नायकवडींच्या हस्ते उद्घाटन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज (प्रतिनिधी) मिरजेत वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी (रुद्रभूमी) व वीरशैव कक्कया समाज स्मशानभूमी (अमरधाम) या दोन्ही स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी या प्रभागाचे माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे. या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले.

याबाबत माहिती देण्यात आली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रलंबित कामांसाठी आमदार इद्रीस नायकवडी यांच्या पाठपुराव्यामुळे ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मिरजेतील या प्रभागाचे नगरसेवक अतहर नायकवडी यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी आणि वीरशैव कक्कया समाज स्मशानभूमी ही कामे या निधीतून प्रस्तावित करून त्यांना मंजुरी मिळवली आहे. आता प्रत्यक्ष या कामांना सुरुवात झाली आहे.

आ. नायकवडी यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लिंगायत समाजातील माजी नगरसेवक महादेव कुरणे, संजय कबाडे, विजय बसरगे, अनिल हारगे, मिलिंद हारगे, राधिका हारगे, उमेश हारगे, ईश्वर जनवाडे, पप्पू मंगावते, सुनील मंगावते, महादेव तशिलदार, वीरशैव कक्कया समाजाचे श्री शंकर पार्वती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश सोनवणे, सचिव विशाल सोनवणे, खजिनदार तानाजी शिंदे, सदस्य हरि पोळ, दयाधन सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, शिवाजी व्हटकर, अशोक पोळ, गणेश खंदारे, मोहनदास सोनवणे, शिवदास सोनवणे, रामलिंग सोनवणे, अभय पोळ, सिद्धार्थ पोळ, रमेश पोळ, सुहास पोळ, कृष्णदेव पोळ, सदैव कटके, विनायक पोळ यांच्यासह वीरशैव लिंगायत समाज आणि वीरशैव कक्कया समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मिरजेत महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यास दगडाने जबर मारहाण, संतप्त युवकाने डोके फोडले : गुन्हा दाखल..!

Next Post

बेडगेत आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कावीळ ; मिरजेत उपचारासाठी केले दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | चक्क कपडे काढून ‘पुष्पा’ बघत नाचला; पोलिसांनी जाम फोडला..!

बेडगेत आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कावीळ ; मिरजेत उपचारासाठी केले दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group