राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.
मात्र मंत्रिमंडळातील एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. मात्र याचे उत्तर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहे. पण त्यांच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्रीपद कोणासाठी रिकामे ठेवण्यात आले आहे असे विचारण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी महत्वाचे विधान केले आहे. मंत्रीमंडळातील एक जागा जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव ठेवली आहे असे मिटकरी म्हणाले आहेत.
- ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील Amol Mitkari on Jayant Patil ।
आजपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद जयंत पाटील यांच्याबाबत मोठं भाष्य केलंय. अमोल मिटकरी म्हणाले की, मागे एक मंत्रिपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं. मात्र लोकसभेत चांगलं यश मिळालं आणि ते आले नाही. आता एक जागा राखीव ठेवली आहे ती वन डाऊनसाठी ठेवली आहे. मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच आमच्यात येतील. योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतील. मंत्रीमंडळातील एक जागा त्यांच्यासाठीच राखीव आहे, असे त्यांनी म्हटले.
- भुजबळ राज्यसभेवर जाणार
तर मंत्रीमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी नाराज असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, “भुजबळ नसल्याने ओबीसी बांधव नाराज असल्याचं दिसलं. मात्र भुजबळ हे राज्यसभेवर जाणार आहेत. मुनगंटीवार, केसरकर यांना शपथ घेता आली नाही. तिन्ही पक्षातील नाराजांसोबत बोलतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांवर फोकस झालं पाहिजे, “असे त्यांनी म्हटले आहे.

