महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी सह पत्नी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान सर्वांनी करावे असे आवाहन केले. मिरज विधान सभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया सुरू झाली सकाळ पासून मतदान केंद्रावर आपला मताचा हक्क बजावण्यासाठी महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या, मिरज शहरात आयडियल इंग्लिश स्कूल येथे मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.. माजी पालक मंत्री आणि या निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुमनताई खाडे यांनी रांगेत उभारून मतदान हक्क बजावला.


