• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मतदानाच्या सुरुवातीला मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

Admin by Admin
November 20, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | मतदानाच्या सुरुवातीला मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळून आले.यानंतर साधारण २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलण्यात आले आहेत.

संभाजीनगर (#Sambhajinagar News) जिल्ह्यातील ३ हजार २७३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण ३२ लाख २ हजार मतदार आज दिवसभरात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. (Vidhan Sabha Election) तरी देखील जिल्ह्यातील काही ठिकाणी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असता ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे प्रकार आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून लगेचच तेथील आधीच्या ईव्हीएम बदलून राखीव कोट्यातील ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली.

पहिल्या दोन तासातच मशीन बदलले

जिल्ह्यात मतदानाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात जिल्ह्यात २८ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट आणि २९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र मशीन बदलल्यानंतर मतदानाला सुरवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

प्रशासनाकडून बारकाईने लक्ष

शहरी भागातील १०० टक्के मतदान केंद्रांवर तर ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून या मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तिथल्या प्रत्येक हालचाली या नियंत्रण कक्षातून टिपल्या जात आहेत. वेब कास्टिंग होत असलेल्या या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, ५ जणांनी झाडल्या गोळ्या, सर्वत्र खळबळ

Next Post

मिरजेत महायुतीचे उमेदवार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत महायुतीचे उमेदवार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

मिरजेत महायुतीचे उमेदवार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group