• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत किराणा दुकान आगीत भस्मसात : घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार.?

Admin by Admin
November 12, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत किराणा दुकान आगीत भस्मसात : घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | शहरातील वैरण बाजार परिसरात असणार्‍या एका तीन मजली किराणा दुकानाला भीषण आग लागली. या आगीत किराणा दुकान पूर्णपणे भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मिरजेतील वैरण बाजार परिसरामध्ये मुन्ना भोजमुलानी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. भोजमुलानी हे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. परंतु या दुकानाला सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

काही क्षणात आग भडकली. त्यामुळे तीन मजली किराणा दुकान क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, महावितरण आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महावितरण कडून तातडीने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील सांगली आणि मिरजमधील आठ अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून आग विझवण्याचे सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु तीन मजली दुकानात दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी अत्यंत अरुंद रस्ता असल्यामुळे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

भोजमुलानी यांच्या किराणा दुकानात किराणा माला सह खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात साठा होता. त्यामुळे तळमजल्यावर असणार्‍या किराणा दुकानात शॉर्ट सर्किटमध्ये लागलेली आग दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर असणार्‍या तेलाच्या साठ्यापर्यंत क्षणार्धात पसरली. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर असणार्‍या तेलाच्या साठ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. त्यामुळे दुकानातील सर्व किराणामाल जळून खाक झाला. त्यामुळे किराणा मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

मिरजेतील आगीची माहिती मिळताच सांगली आणि मिरजमधील अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. एकाच वेळी सर्व गाड्यांमधील पाण्याच्या फवार्‍याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु तरीदेखील आग आटोक्यात आणण्यासाठी दोन तासाहून अधिक काळ अग्निशमन विभागाला लागला.

  • घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार

आगीची घटना समजतात परिसरातील तसेच मिरज शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी वारंवार सूचना करून देखील घटनास्थळावरून नागरिकांचा जमाव न हटल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Previous Post

मिरजेत सी आर सांगलीकरांचा जिल्हा काँग्रेस नेत्यांवर प्रहार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून दिलगिरी.. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका..?

Next Post

ब्रेकिंग | मिरजेतील काँग्रेस नेते प्रा. मोहन वनखंडे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेतील काँग्रेस नेते प्रा. मोहन वनखंडे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी.!

ब्रेकिंग | मिरजेतील काँग्रेस नेते प्रा. मोहन वनखंडे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group