• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत सी आर सांगलीकरांचा जिल्हा काँग्रेस नेत्यांवर प्रहार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून दिलगिरी.. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका..?

Admin by Admin
November 12, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेत सी आर सांगलीकरांचा जिल्हा काँग्रेस नेत्यांवर प्रहार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून दिलगिरी.. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी – खबऱ्या ऑनलाईन – मिरज मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिलेल्या उमेदवाराने शिवसेना (ठाकरे) गटाने बोलावलेल्या पत्रकार बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यावर आगपाखड केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे.पत्रकार बैठकीनंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुसवा अद्याप कायम आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाला हे अखेरच्या क्षणापर्यंत अस्पष्ट होते. यामुळे काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या सी. आर. सांगलीकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मिरजेत शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगलीकर यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी मुदतीत उमेदवारीही मागे घेतली. मात्र, आघाडीच्या सातपुते यांना पाठिंबा जाहीर केलेला नव्हता.

दोन दिवसांच्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार बैठकीत पाठिंबा जाहीर करण्याचे मान्य केले. यानुसार बैठक बोलावण्यात आली. मात्र, या वेळी त्यांनी पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी भूमिका मांडत असताना काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील हे केवळ पै-पाहुण्यांचे राजकारण करतात. त्यांना आंबेडकरी समाजाची मते हवीत; मात्र संधी देण्याची इच्छा नसते. त्यांचे स्वार्थी राजकारण असून, यापुढील काळात त्यांना आंबेडकरी समाजाचे मतदानच होऊ देणार नाही. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मला पक्षाने संधी दिली, तर ठीक अन्यथा मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देणार, असेही जाहीर केले.

तथापि, या वेळी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, उमेदवाराचे बंधू बसवेश्वर सातपुते यांची काँग्रेस नेत्यांवर आगपाखड केल्याने गोची झाली. पत्रकार बैठकीनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आमच्या नेत्यावर टीका होत असेल, तर आम्हाला गृहीत धरू नका, असे सांगितले आहे. अखेर जिल्हाप्रमुख विभुते यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुसवा अद्याप कायम आहे.

Previous Post

मूकबधिर, मतिमंद तरुणाचा बेळंकी येथे निर्घृण खून

Next Post

मिरजेत किराणा दुकान आगीत भस्मसात : घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत किराणा दुकान आगीत भस्मसात : घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार.?

मिरजेत किराणा दुकान आगीत भस्मसात : घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group