• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मूकबधिर, मतिमंद तरुणाचा बेळंकी येथे निर्घृण खून

Admin by Admin
November 11, 2024
in क्राईम
1 min read
0
मूकबधिर, मतिमंद तरुणाचा बेळंकी येथे निर्घृण खून
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सलग दोन दिवस तालुक्यात खुनाचे सत्र सुरु…?

बेळंकी (ता. मिरज) येथे जानराववाडी रस्त्यावर एका मूकबधिर, मतिमंद तरुणाचे डोके दगडावर आपटून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. उमेश पांडुरंग कांबळे (वय 40, रा. बेळंकी) असे मृताचे नाव आहे.सलग दुसर्‍या दिवशी तालुक्यात खुनाची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, बेळंकी ते जानराववाडी रस्त्यावर रेल्वे पुलानजीक रविवारी सकाळी उमेश या मूकबधिर व मतिमंद तरुणाचा मृतदेह रस्त्याकडेला पडल्याचे निदर्शनास आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याचे दगडावर डोके आपटून त्याचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची शक्यता आहे. तो नेहमी गावात फिरत असेे. शनिवारी रात्री तो घरी परतला नाही. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बेळंकीचे पोलिस पाटील चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानपथक घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. मिरज ग्रामीण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे.

Previous Post

मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

Next Post

मिरजेत सी आर सांगलीकरांचा जिल्हा काँग्रेस नेत्यांवर प्रहार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून दिलगिरी.. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत सी आर सांगलीकरांचा जिल्हा काँग्रेस नेत्यांवर प्रहार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून दिलगिरी.. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका..?

मिरजेत सी आर सांगलीकरांचा जिल्हा काँग्रेस नेत्यांवर प्रहार, शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून दिलगिरी.. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group