• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीत मोठी नाराजी, राज्यातील मोठ्या नेत्यानेही सोडली साथ, उमेदवार लादला असल्याच्या प्रतिक्रिया..! मिरजेतही कार्यकर्ते फुटले.?

Admin by Admin
November 7, 2024
in राजकीय
1 min read
0
वंचित बहुजन आघाडीत मोठी नाराजी, राज्यातील मोठ्या नेत्यानेही सोडली साथ, उमेदवार लादला असल्याच्या प्रतिक्रिया..! मिरजेतही कार्यकर्ते फुटले.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या – मिरज प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांबाबतच आता त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम असलेल्या कार्यकर्त्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे ४० वर्षांपासून विश्वासू असलेल्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या होम ग्राऊंडवरील नेत्याने त्यांची साथ सोडली. प्रा. डॉ. संतोष हुशे वंचित बहुजन आघाडीचा मोठा नेता होता. त्यांनी पक्ष वाढवला- विस्तारला. परंतु, उमेदवार लादल्याच्या तीव्र संतापाने ४० वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या प्रा. डॉ. हुशे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची साथ सोडली.

वंचित बहुजन आघाडीमध्ये एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मानापमानाचे नाराजी नाट्य चांगलेच रंगू लागले आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाहेर पडले असल्याचे दिसत आहे. तर जिल्ह्यात संघटन बांधणी करीत वंचित बहुजन आघाडीचा विस्तार करणाऱ्या इंद्रजित घाटे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला व जिल्ह्यातील ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवलेले व प्रेम असलेले भीमसैनिक, बाळासाहेब प्रेमी यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे मिरज विधानसभेचे उमेदवार यांचे पक्षासाठी योगदान काय..? विज्ञान माने हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबत कार्यकर्ते नाहीतच तर काँग्रेस – राष्ट्रवादीचे काही बोटावर मोजण्या इतपत मोजके लोकं आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता माने यांच्यासोबत नाही.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांचा आणि उमेदवार विज्ञान माने यांचा संपर्क नसल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. थेट आमच्यावर हा उमेदवार लादला असल्याच्या प्रतिक्रिया भीमसैनिक देत आहेत. त्यामुळे ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मनाला वाटेल तसे करत असतील व आमच्यावर उमेदवार लादत असतील तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही पक्षातून बाहेर पडायला लागले तरी चालेल. असा थेट इशाराच काही नाराज असणाऱ्या कडव्या भीमसैनिकांनी दिला आहे.

Previous Post

एमआयएमच्या डॉ. महेशकुमार कांबळे यांना मोठा पाठिंबा, वाचा सविस्तर..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | अडीच लाखांचा गांजा जप्त, दोघे ताब्यात एकजण फरार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग | अडीच लाखांचा गांजा जप्त, दोघे ताब्यात एकजण फरार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group