मिरज प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. महेशकुमार कांबळे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मिरज शहरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. बुधवारी मिरजेत बैठक पार पडली. या बैठकीत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. समस्त आंबेडकरी समाजाचे नेते नानासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाची बैठक घेण्यात आली.
यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच भारतीय जनता पार्टीने बौद्ध आणि मातंग समाजातील उमेदवारांना वारंवार डावलले आहे.त्यामुळे समाजातील सर्वांनी एकत्र येत एमआयएमचे डॉ महेशकुमार कांबळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी समस्त आंबेडकरी समाजाचे नेते नाना वाघमारे,सलगरचे धनराज वाघमारे,सागर आवळे आरग, विकास कांबळे बेडग, युवराज लोखंडे ढवळी, कुमार बनसोडे लिंगनूर, परशुराम बनसोडे खटाव यांच्यासह समस्त आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

