• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वसंतदादांच्या समाधीवर पृथ्वीराज पाटीलांनी घेतली ‘ही’ शपथ

Admin by Admin
November 4, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
वसंतदादांच्या समाधीवर पृथ्वीराज पाटीलांनी घेतली ‘ही’ शपथ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली – सांगली विधानसभा मतदार संघात गेली पंधरा वर्षे काँग्रेसचा आमदार नाही. हे चित्र बदलायला काँग्रेसच्या विचाराचा प्रत्येक मतदार, कार्यकर्ता सज्ज असताना काही अनपेक्षित घडले आहे. मतदार सुज्ञ आहेत. जे घडतेय, ते का, कसे, कशासाठी, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मी वसंतदादांच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय. मी सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

त्यांनी सायंकाळी कृष्णा नदीकाठावर वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून जबाबदारी आली तेंव्हा काँग्रेसचा कठीण काळ सुरु झाला होता. त्यावेळी वसंतदादांच्या विचाराने वाढलेली काँग्रेस पुढे न्यायची, हाच निर्धार होता.

चहूबाजूंनी संकट असताना, भाजपकडून सुडाचे राजकारण होत असताना त्याविरोधात उभे राहिलो. काँग्रेस विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढला. तो कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही. दहा वर्षे काँग्रेससाठी सारे मिळून झटले. आज समज-गैरसमजातून जे काही घडले आहे, त्यावर नक्की फेरविचार होईल. काँग्रेस एकसंध राहील, असा मला अजूनही विश्वास आहे. आमचे नेत डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांची पूर्ण ताकद सोबतीला उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडातील सर्व घटकपक्ष सोबत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी मला साथ दिली आहे. मी दादांच्या समाधीवर मी शपथ घेऊन आलोय, जिंकल्यानंतर आधी दादांच्या समाधीवर डोके ठेवेन आणि मगच गुलाल उधळेन.’’
ते म्हणाले, ‘‘काँग्रेसमध्ये फूट पडली असे समजून भाजप खूष होत असेल तर त्यांनी स्वप्नातून बाहेर यावे. त्यांनी दहा वर्षे सांगली खड्ड्यात घातली. कार्पोरेट राजकारण केले. राज्यात सत्ता असताना त्यांना सांगलीत बदल घडवता आला नाही. तो घडवायचा असेल तर बदल घडला पाहिजे, याची जाणीव मतदारांना आहे. त्यांच्यासमोर आम्ही ताकदीने जाऊ.’’

Previous Post

ब्रेकिंग | मिरजेत पाच लाखांची रोकड जप्त, स्थिर सर्वेक्षण पथक व पोलिसांची कारवाई..

Next Post

सांगली | डंपरची दुचाकीस धडक; महिला वकिलाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | डंपरची दुचाकीस धडक; महिला वकिलाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी.

सांगली | डंपरची दुचाकीस धडक; महिला वकिलाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group