• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इंडियन आर्मीची एक तुकडी शहरात दाखल – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Admin by Admin
July 26, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इंडियन आर्मीची एक तुकडी शहरात दाखल – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – खबऱ्या प्रतिनिधी | जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. यदा कदाचित पुढील काही दिवसात पूरस्थितीचे संकट उद्भभवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून इंडियन आर्मीची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली आहे. यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिली.

या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या पावसाचे प्रमाण तसेच कोयना धरणातून विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले असले तरी गाफील राहून चालणार नाही. शनिवार व रविवार या दिवशी अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकेल. आपत्कालीन स्थिती उद्भभवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे.


यावेळी पोलीस अधीक्षक श्री. घुगे, मनपा आयुक्त श्री. गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.


तर आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या मदतीकरता आम्ही तत्पर आहोत. आर्मीच्या (सैन्यदल) वतीने आम्ही सर्वस्वी योगदान देऊ, अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली. यावेळी मेजर विनायक, लेफ्टनंट आदित्य पुष्करनाथ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार लीना खरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीच्या दिशेने एक पथक रवाना..

Next Post

खळबळजनक : मिरजेतील निलजी गावात शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून ७० हजाराचा ऐवज लुटला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

खळबळजनक : मिरजेतील निलजी गावात शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून ७० हजाराचा ऐवज लुटला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group