• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin by Admin
April 14, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कुरूंदवाडी (ता.आटपाडी) येथे वगरे वस्तीवरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलीसांनी तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अड्डा चालक अर्जुन गवंड आणि काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरले.या मोठ्या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांचे विशेष पथक शनिवारी सायंकाळी कुरुंदवाडीत दाखल झाले. झरे लगतच्या कुरुंदवाडी गावात सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वगरे वस्ती आहे.या वस्तीवर चवरे यांचे जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन गवंड रा. आटपाडी हा बेकायदेशीरपणे तीन पानी जुगाराचा अड्डा चालवत असल्याची खात्री पथकाने केली आणि तात्काळ छापा टाकला.खेळणाऱ्या व्यक्तींनी पत्त्याची पाने व रोख रक्कम टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलीसांनी त्यांना पकडले.

या कारवाईत मोहन लक्ष्मण खर्जे (वय ४४ रा.विभुतवाडी जि. सांगली), सुरज पांडुरंग घोलप (वय २२ रा. रहिमतपूर जि. सातारा), सचिन काशिनाथ माने (वय ४२ रा. काळचौंडी जि. सातारा), मारुती नागदेव मोटे (वय ४० रा. वरकुटे, जि. सातारा), शंकर मारूती फडतरे (वय ६९ रा. झिरे जि. सातारा), गणेश बाळाराम राठोड (वय ५० वर्षे रा.विभूतवाडी जि. सांगली), उमेश सोपान गुरव (वय ५७ रा. वडझर जि. सातारा), विष्णु रामा माने (वय ६५ रा. झरे जि. सांगली) यांना ताब्यात घेतले.

अंगझडती घेऊन त्यांच्याकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड, पत्त्याची पाने, ५७ हजार ५०० रुपयांचे ११ मोबाईल, १८ लाख ५० हजारांची तीन चारचाकी वाहने, ५ लाख २० हजार रुपयांच्या ९ मोटारसायकल आणि ९७ हजार रुपयांचे अन्य साहित्य असा २६ लाख ४६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने ताब्यात घेतलेले ८ आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला.

सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेल्या या अड्डयावर विशेष पथकाने कारवाई केली.दुष्काळी भागातील या अड्ड्यावर आलिशान कार, मोटारसायकल,विजेची सोया आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कुलर देखील ठेवण्यात आले होते.विशेष पथकाने छापा टाकत हा अड्डा उघडकीस आणला.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | मिरजेत नेत्यांची गुप्त बैठक..! ‘या’ उमेदवाराच्या प्रचारासाठी एकवटल्याची माहिती..?

Next Post

अंकलखोपमध्ये म्हसोबा यात्रेला आजपासून सुरुवात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अंकलखोपमध्ये म्हसोबा यात्रेला आजपासून सुरुवात

अंकलखोपमध्ये म्हसोबा यात्रेला आजपासून सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group