• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र झळकावले

Admin by Admin
April 13, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र झळकावले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच सुरु होती. अशात महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली असून, चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. आता तर विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी चक्क त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहले आहे. तसेच विशाल पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हे रक्ताची पत्र झळकावण्यात आले आहे.

विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्तांने पत्र लिहले आहे. रक्ताने पत्र लिहत विशाल पाटलांना लोकसभा निवडणूक लढवण्याची जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. सांगलीत विशाल पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रक्ताची पत्र झळकावत विशाल पाटलांना निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षण मागणी बाबत भाजपकडून खोटे आश्वासन दिल्याचा आरोप करत, आरक्षण मिळवून देण्यासाठी विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. रक्ताने लिहिलेले पत्र विशाल पाटलांच्याकडे सुपूर्द करत धनगर बांधवांचा पाठिंबा असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

विशाल पाटलांची भूमिका काय?

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाला पाटील सुरवातीपासूनच इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम देखील प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे कदम आणि पाटील यांनी सांगलीच्या जागेसाठी थेट दिल्ली गाठत सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी वरिष्ठांकडे भूमिका मांडली. हे सर्व सुरु असतानाच ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करून टाकली. त्यामुळे तिढा आणखीनच वाढला. मात्र, शेवटी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अंतिम निर्णय घेत ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. मात्र, विशाल पाटील यांनी अजूनही माघार घेतल्याचे स्पष्टपणे सांगितले नाही. अशात त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तसेच, ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे विशाल पाटील यांची भूमिका नेमकी काय हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तर चंद्रहार पाटलांची अडचण वाढणार?

महाविकास आघाडीकडून सांगलीमधून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, विशाल पाटील यांनी अजूनही चंद्रहार पाटील यांना पाठींबा दिलेला नाही. तसेच विशाल पाटील यांच्याकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास आणि विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेल्यास याचा फटका महाविकास आघाडीला म्हणजेच विशाल पाटील यांना बसण्याची शक्यता आहे.

Previous Post

सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु..

Next Post

मोठी ब्रेकिंग | कुपवाड परिसरात गुटखा कारखान्यावर पोलिसांची मोठी कारवाई ..! ‘एवढ्या’ रक्कमेचा साठा जप्त.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | कुपवाड परिसरात गुटखा कारखान्यावर पोलिसांची मोठी कारवाई ..! 'एवढ्या' रक्कमेचा साठा जप्त.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group