• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु..

Admin by Admin
April 13, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात जिल्ह्यात अवैध गाेष्टींवर आळा बसावा यासाठी पाेलिस यंत्रणा सतर्क आहे. पाेलिसांनी सांगलीत विनापरवाना वाहतूक होत असलेली तब्बल २६ लाखाची चांदी जप्त केली आहे.

निवडणूक आचारसंहितेमुळे सांगलीवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी गस्ती पथकाकडून करण्यात येते. यावेळी एका वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी मोटारीमध्ये २५ लाख ९२ हजार ११४ रूपये किंमतीचे ४१ किलो ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे तयार दागिने आढळून आले.

वाहन चालक देवेंद्र बाबूलाल माळी (वय २०, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) याच्याकडे या चांदीच्या दागिन्याची वाहतूक करण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळला नाही. यामुळे गस्ती पथकातील निखील म्हांगोरे, शंकर भंडारी व प्रमोद भिसे या कर्मचार्‍यांनी चांदीच्या दागिन्यासह वाहन चालकाला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आचारसंहिता विशेषाधिकार समिती व प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून या दागिन्याचा उगम, विल्हेवाट यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग | विट्यात गादी कारखान्याला आग

Next Post

सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र झळकावले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र झळकावले

सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र झळकावले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group