• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्याला नवे गृहमंत्री मिळणार..? वळसे पाटीलांवर शिवसेना नाराज..?  ‘ या ‘ नेत्याचे नाव आघाडीवर.

Admin by Admin
April 22, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राज्याच्या गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे पाटील यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे.

गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हातात गृहखात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. १ मे पूर्वी हा बदल होऊ शकतो. याबाबतचे एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर ईडी कारवाई होत असताना गृहखात्या कडून म्हणावा तसा पलटवार भाजप नेत्यांवर केला जात नसल्याची तक्रार यापूर्वी देखील सरकारमधील नेत्यांकडून केली जात होती. तेव्हापासूनच गृहमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी देण्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यापूर्वीच गृहखात्याबाबत उघड नाराजी व्यक्त करत म्हंटल होत कि, गृहखात्याने दमदार पाऊले टाकली पाहिजेत, अस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वतःभोवती तुम्ही फाशीचा दोर आवळत आहात असा इशारा त्यांनी दिला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना म्हंटल होत की , वळसे पाटील साहेब, गृहखात्याचा हिसका दाखवा आणि भाजपच्या २-४ नेत्यांना तुरुंगात टाका, आधीच हे काम केलं असत तर आज परिस्थिती आली नसती असे म्हणत त्यांनी वळसे पाटलांचे कान टोचले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

Previous Post

खळबळजनक | मंत्र्यांचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला..? वैद्यकीय बिलं दाखवून ‘माल’ गडप करण्याचा एकमेकांना सल्ला..?

Next Post

मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रार…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रार…

मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रार…

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group