• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ‘विशाल पाटलांना संसदेत….! संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Admin by Admin
April 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | ‘विशाल पाटलांना संसदेत….! संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल, असा प्रस्ताव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सांगलीत पोहचताच दिला.विशाल यांच्याविषयी आस्था आणि प्रेम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत आजपासून तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत. कवलापूर विमानतळाच्या जागेवर ते हेलिकॉप्टरने पोहचले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. चंद्रहार पाटील यांचा उल्लेख त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असा केला. विशाल यांना कोणत्या मार्गाने संसदेत नेणार याविषयी मात्र त्यांनी काही स्पष्ट केले नाही.

ते म्हणाले, ”काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक लवकरच प्रचारात सहभागी होतील. कालच माझे आमदार जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. ते दोन दिवसांत कामाला लागत आहेत. काँग्रेसची कामाची पद्धत जरा वेगळी आहे. त्यांची वर्किंग कमिटी आहे. वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे आदेश यावे लागतात. विश्‍वजीत कदम आमचे आहेत, विशाल पाटील हेही आमचेच आहेत.”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल आज सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते आघाडी धर्म पाळत नसल्याची टीका केली. त्यावर श्री. राऊत म्हणाले, ”काँग्रेसने रामटेकची उमेदवारी जाहीर केली आम्ही काही बोललो का? आम्ही कामाला लागलो. आघाडी धर्म सगळेच पाळत आहेत, तेही पाळतील, आम्हीही पाळू.”

Previous Post

“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..

Next Post

LIVE | शिवसेनेच्या गुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी संजय राऊत नेमकं काय म्हणाले.. पहा लाईव्ह..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

LIVE | शिवसेनेच्या गुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी संजय राऊत नेमकं काय म्हणाले.. पहा लाईव्ह..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group