सांगली : साडेपाच महिन्यांपासून संपात सहभागी राहिल्यानंतर आज अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले. परंतु, कामावर रूजू होताना लालपरीला पाहिल्यानंतर अनेक महिला कर्मचाऱ्यांना गहिवरून आले.
इतकेच नाही तर लालपरीला (MSRTC Bus) मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (sangli news st women employee returned to work and cried She hugged the bus)
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरणाच्या मागणीसाठी संप (St Strike) पुकारला होता. साडेपाच महिने संप चालला. परंतु न्यायालयाने कर्मचारींना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयाचा (Sangli News) आदर राखत सांगलीत 300 एसटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. आज सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत एसटी डेपोत जाऊन लालपरीचे स्टेअरिंग सांभाळले.
लालपरीचे चुंबन घेत मारली मिठी
गेली साडेपाच महिन्यांपासून लालपरीपासून दूर असल्याने आज लालपरीला पाहून अनेक महिला कर्मचार्यांना रडू कोसळले. यावेळी महिला कर्मचाऱ्यानी लालपरीचे चुंबन घेत लालपरीला मिठी मारत महिलांनी अश्रूला वाट दिली. त्यामुळे एसटी डेपोतील वातावरण गहिवरून गेले होते. यावेळी सर्वच संपकरी एसटी कर्मचाऱ्यानी कामावर हजर होऊन लालपरीची सेवा करण्याची ग्वाही दिली. याचबरोबर आम्ही सर्व गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबाही राहील अशी घोषणाही केली.

