• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगावातील लाचखोरीचे अटकेपार ‘झेंडे’ लावणाऱ्या ‘एपीआय’ ची मे मध्ये उचलबांगडी..

विश्वसनीय सुत्रांची माहिती : अनेक भानगडी वरिष्ठांच्या कानावर..

Admin by Admin
April 19, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव : गोपनीय खबऱ्या

राज्यातील बहुतांशी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मे महिन्यात निघण्याचे संकेत आहेत. त्यामध्ये तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या उचलबांगडीचे संकेत मिळत आहेत. हा लाचखोर पोलीस अधिकारी स्वतःला बजरंग बलीचा अवतार समजतो. त्याने लाचखोरीत अटकेपार झेंडे लावले आहेत. त्याच्या अनेक भानगडी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर आहेत. हा अधिकारी पोलीस दलाला कलंक आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या भानगडबाज अधिकाऱ्याची तासगावातून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.

तासगाव तालुका हा अतिशय संवेदनशील तालुका आहे. याठिकाणी नोकरी करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. याच गुन्ह्यांतून अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. शिवाय मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी सेंटर, बेकायदा वाळू उपसा असे अनेक अवैध धंदे तालुक्यात राजरोसपणे सुरू आहेत. हे सगळे काळे धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे काळे धंदे करणाऱ्यांना अभय मिळत आहेत. पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तर अनेकांच्या मुंड्या मुरगळायला सुरुवात केली आहे. हा अधिकारी सोन्याची सुरी घेऊनच बसलेला असतो. त्याच्याकडे तपासला असणाऱ्या अनेक गुन्ह्यात तोडपाणी करून लाखो रुपयांचा मलिदा आजपर्यंत मिळवला आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला गुरगुरत हा अधिकारी आपल्या खाकी वर्दीतील मस्ती दाखवत असतो. मस्तवालपणा या अधिकाऱ्याच्या नसानसात भिनलेला आहे. एखादे कुत्रे जसे येणा – जाणाऱ्यावर गुरगुरत असते तसे हा अधिकारी सतत डारडूर करीत असतो.

गेल्या काही महिन्यांपासून या अधिकाऱ्याने छापखानाच सुरू केला आहे. प्रत्येक प्रकरणात ‘हात‘ मारण्याची त्याला सवय लागली आहे. कोणाला कारवाईची धमकी देऊन तर कोणाला तपासात मदत करतो असे सांगून लुबाडले जात आहे. या अधिकाऱ्याचे लाचेचे आकडेही त्याच्या तब्बेतीप्रमाणेच आहेत. 25 हजार, 50 हजार ते लाखांपर्यंत आकडे सांगून ‘सौदा‘ केला जात आहे. मध्यंतरी तर एका प्रकरणात गुन्हेगारांना मदत करण्यासाठी या अधिकाऱ्याने चक्क 50 हजारांचे ‘डिलिंग’ केले आहे.

या ‘डिलिंग’ची शहरभर चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून त्यांनाही वरती पैसे द्यावे लागतात, असे सांगून या अधिकाऱ्याने आपला खिसा भरून घेतला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी गोरगरिबांच्या नरड्याला नख लावण्याचे पाप हा अधिकारी बिनदिक्कतपणे करीत आहे. गेल्या काही महिन्यात केलेल्या तडजोडीतून या अधिकाऱ्याने लाखो रुपयांची ‘माया’ जमा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हल्ली या अधिकाऱ्याचा खिसा चांगलाच गरम असतो.

वरिष्ठांच्या नावावर नुकतेच त्याने 50 हजारांचे तोडपाणी केले आहे. मात्र यातील वरिष्ठांना काहीही माहीत नसल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या लाचेच्या रकमेतील एक रुपयाही वरिष्ठांना दिला नसल्याचे समजत आहे. त्यामुळे सगळी 50 हजारांची रक्कम या अधिकाऱ्याने स्वतःच्या घशात कोंबली असल्याचे स्पष्ट आहे.

या अधिकाऱ्याचे असे अनेक कारनामे कानावर येत आहेत. स्वतःला बजरंग बलीचा अवतार समजणाऱ्या या अधिकाऱ्याने लाचखोरीत लावलेले अटकेपार झेंडे अख्ख्या तासगावात चर्चिले जात आहेत. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासारखे चांगले अधिकारी तासगावला मिळाले असताना या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मात्र पोलीस ठाण्याच्या बदनाम करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे असल्या थर्ड क्लास अधिकाऱ्याला फटाके वाजवून निरोप देण्याची गरज आहे.

वरिष्ठ अधिकारीही या लाचखोर अधिकाऱ्याच्या माकडचाळ्यांमुळे नाराज आहेत. मे महिन्यात बदल्यांवेळी त्याला ‘नारळ‘ देण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्यामुळे जर अखंड पोलीस ठाण्याला कलंक लागत असेल तर या अधिकाऱ्याला हाकलून देण्याची गरज आहे. त्यामुळे मे महिन्यात त्याची उचलबांगडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

Previous Post

बेकायदा दस्त नोंदणी ; सरपंच,तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत अधिकारी रडारवर, १६२ बनावट प्रकरणांची माहिती मागवली, सांगली जिल्ह्यातील काही तलाठी, मंडळ अधिकारी, कारवाईच्या रडारवर..!

Next Post

सांगली | कामावर परतताच लाल परीला पाहून महिला कर्मचारी रडल्या, बसला मारली मिठी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | कामावर परतताच लाल परीला पाहून महिला कर्मचारी रडल्या, बसला मारली मिठी..

सांगली | कामावर परतताच लाल परीला पाहून महिला कर्मचारी रडल्या, बसला मारली मिठी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group