• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेकायदा दस्त नोंदणी ; सरपंच,तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत अधिकारी रडारवर, १६२ बनावट प्रकरणांची माहिती मागवली, सांगली जिल्ह्यातील काही तलाठी, मंडळ अधिकारी, कारवाईच्या रडारवर..!

Admin by Admin
April 19, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय
1 min read
0
बेकायदा दस्त नोंदणी ; सरपंच,तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत अधिकारी रडारवर, १६२ बनावट प्रकरणांची माहिती मागवली, सांगली जिल्ह्यातील काही तलाठी, मंडळ अधिकारी, कारवाईच्या रडारवर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे/सांगली :- स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी पर्यायी कागदपत्रे देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी ग्रामपंचायतींकडून देण्यात येणाऱ्या कर आकारणी दाखल्याचा (आठ-ड) आधार घेतल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या निदर्शनास आले आहे. हे दाखले तलाठी आणि प्रांत यांनी दिले असल्याने बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणात हे अधिकारी रडारवर आले आहेत.

ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या जमा-खर्चाचा हिशोब आठ-ड या उताऱ्यामध्ये असतो. रेरा आणि तुकडा बंदी कायद्यांमुळे दस्त नोंदणी करण्यात अडचण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर दुय्यम निबंधकांनी आठ-ड या उताऱ्याचा आधार घेतला. हा उतारा ग्रामपंचायतींकडून देण्यात येतो. जमिनीचा कर हा संबंधित व्यक्तीने भरला असल्याचे या उताऱ्यावरून स्पष्ट होते. मात्र, त्या जागेचा मालक असल्याचे दाखवून त्याद्वारे दस्त नोंदणी करण्यात आली आहे. हे दाखले देण्यात त्या गावांचे सरपंच, तलाठी आणि प्रांत यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याचे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. तलाठी आणि प्रांत या अधिकाऱ्यांकडून सर्रास हे दाखले देण्यात येत होते. त्यामुळे हे अधिकारी रडारवर आले आहेत.

१६२ बनावट एनए प्रकरणांची माहिती मागवली

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक तीनमध्ये दस्त नोंदणीसाठी वापरण्यात आलेले अकृषिक परवाने (एनए) बनावट असल्याची १६२ प्रकरणे आढळून आली आहेत. या प्रकरणांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यातील गैर तपशील जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

अशी उघड झाली बेकायदा दस्त नोंदणी

५०० चौरस मीटरपेक्षा अधिकचा भूखंड किंवा आठपेक्षा जास्त सदनिका विक्रीस असणे असा प्रकल्प असल्यास रेराकडे नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी ताबा पावती आणि ग्रामपंचायतीने घराच्या मालकीचा दिलेला दाखला (आठ-ड) देऊन रेराकडे नोंद न करता दस्त नोंदणी केली. मात्र, दस्तांची तपासणी करताना एकाच बिल्डरचे नाव अनेक सदनिकांच्या दस्तात दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

सांगली जिल्ह्यातील काही तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत ही कारवाईच्या रडारवर

सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी बोगस प्रकरणे झाली आहेत. ह्यात तलाठी, मंडळ अधिकारी यांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका मंडळ अधिकाऱ्याच्या बातम्या प्रसारित केल्यामुळे काही जणाकडून पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. जखमी पत्रकाराने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच बरोबर महसूल आयुक्त, पुणे यांना पत्रव्यवहार केल्याने पुण्यासहित इतर जिल्ह्यातही कारवाईचा धडाका सुरू आहे. संबंधित पत्रकाराने याचिका दाखल केल्याचे ही विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.मुद्रांक नोंदणी विभागातील काहीजणांना नोटीस मिळाली आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

भोंग्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.. गृह विभागाने दिले ‘हे’ महत्वपूर्ण आदेश..!

Next Post

तासगावातील लाचखोरीचे अटकेपार ‘झेंडे’ लावणाऱ्या ‘एपीआय’ ची मे मध्ये उचलबांगडी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

तासगावातील लाचखोरीचे अटकेपार 'झेंडे' लावणाऱ्या 'एपीआय' ची मे मध्ये उचलबांगडी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group