• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून..!

Admin by Admin
March 18, 2024
in विशेष
1 min read
0
महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भंडारा प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – भंडारा शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणत आहे. सायंकाळच्या सुमारास गांधी चौक ते एस टी स्टँड पर्यंत दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र या समस्या सोडवण्याऐवजी त्यात आणखी भर घालण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भंडाऱ्यात एका महिला पोलीस निरीक्षकाने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकाराचे रेकॉर्डिंग करत असताना महिला पोलीस निरीक्षकाने पत्रकारालाच उर्मट प्रश्न करत पहिल्या पेजवर बातमी येईल का असं म्हटलं.

भंडाऱ्यात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी भर पाडली ती राष्ट्रीय महामार्ग सहायक पोलीस निरीक्षिका रजनी तुमसरे यांनी. रजनी तुमसरे या बाजारात खरेदी करायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरच पार्क केली. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

महत्त्वाची बाब म्हणजे रजनी तुमसरे यांच्या रस्त्यातील गाडीमुळे अँब्युलन्स सुध्दा या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. जवळपास एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण पोलीस निरीक्षिका रजनी तुमसरे यांच्यामुळे इतर नागरीक देखील गप्प होते. या सगळ्या प्रकाराची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळाली तेव्हा त्यांनी तिथे पोहोचून या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर वाहतूक शाखेने या गाडीवर दंड देखील आकारला आहे.

दरम्यान, दुसरीकडे व्हिडिओ काढत असलेल्या पत्रकारालाच उलटं पहिल्या पेजवर बातमी येईल का.?असा उर्मट प्रश्न रजनी तुमसरे यांनी विचारला आहे. त्यामुळे पोलीसच नियम मोडत असतील तर इतरांच काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Previous Post

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी येडगे

Next Post

सांगली | शेतकऱ्यांचा पाणीप्रश्नावर टाहो.! ४५ गावांतील पिके वाळली.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

सांगली | शेतकऱ्यांचा पाणीप्रश्नावर टाहो.! ४५ गावांतील पिके वाळली.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group