• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू, घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकाऱ्यांची चिंता वाढली..

Admin by Admin
April 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू, घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकाऱ्यांची चिंता वाढली..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

चाैकशी अधिकारी ॲड. आर. डी. रैनाक यांनी तातडीने दोन सुनावण्या घेऊन महिन्याअखेरीस उलट तपास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे.

वसंतदादा बँकेतील घोटाळाप्रकरणी सहकार विभागाकडील एका अपिलवर सुनावणीवेळी २०१८ मध्ये स्थगिती दिली गेली होती. त्यानंतर त्यावर सुनावणी प्रलंबित असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून चौकशी थांबली होती. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करताना सहकारमंत्र्यांसमोर हे अपिल फेटाळण्यात आल्याने बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महिन्याअखेरीस उलट तपासणी होण्याची चिन्हे आहेत.

अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर संबंधितांच्या मालमत्ता जप्तीचे आदेशही त्यांनी काढले होते. अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया आल्यानंतर तत्कालिन सहकारमंत्र्यांनी एका अपिलावर स्थगिती दिली व प्रदीर्घ काळ चौकशी ठप्प होती.

Previous Post

कलाकारांच्या अस्तित्वासाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव गरजेचा – काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मेस्त्री

Next Post

पोलीस अधिकाऱ्याने केला ग्रामपंचायत सदस्याला जीवे मारण्याचा प्रयत्न..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

पोलीस अधिकाऱ्याने केला ग्रामपंचायत सदस्याला जीवे मारण्याचा प्रयत्न..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group