• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस अधिकाऱ्याने केला ग्रामपंचायत सदस्याला जीवे मारण्याचा प्रयत्न..?

Admin by Admin
April 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर :खबऱ्या प्रतिनिधी/ कुरळप (ता. वाळवा) येथील राजारामबापू सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या जय हनुमान पॅनलच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली.

मिरवणुकीतील काहींनी दगडफेक केल्यावर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र, कुरळप पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कोणतीही शहानिशा न करता विरोधी पॅनलचे ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत त्यांच्या बडतर्फीची मागणी पॅनलचे नेते पै. अशोक पाटील यांनी बुधवारी केली.

इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत युवक क्रांती शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अशोक पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सत्ताधारी पॅनलचे प्रमुख पी. आर. पाटील हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. निकालानंतर त्यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्याला परवानगी होती का? सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या सहकार्यानेच ही मिरवणूक सुरू होती. युवक क्रांती पॅनलच्या संपर्क कार्यालयासमोर मिरवणूक आल्यावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना शिवीगाळ केली. तसेच दगडफेकही केली. मात्र, पोलिसांनी आमच्यावरच लाठीहल्ला केला. त्यामुळे आम्ही सर्व जण निघून गेलो.

पाटील म्हणाले, लाठीहल्ला झाल्यानंतर अर्ध्या तासाने घरी जात असताना सहायक पाेलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी सुनील पाटील यांच्या डोक्यात काठीने मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. जाधव यांना बडतर्फ करावे, यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक व्ही. टी. पाटील, सुभाष पाटील, मारुती जाधव, अश्विन पाटील उपस्थित होते.

Previous Post

वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू, घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकाऱ्यांची चिंता वाढली..

Next Post

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार …

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार …

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group