कोल्हापूर येथे गोव्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल कोल्हापूर येथील राधानगरी रोड पुईखडी येथे उलटल्याने अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
ट्रॅव्हल्स हीव्हीआरएल कंपनीची होती. बस वळण घेताना उलटल्याने ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने बचावकार्य करत ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांची सुटका केली. ४ प्रवासी बसच्या खाली अडकले होते त्यांना काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे. अपघातात नीलू गौतम, (वय४३), रिधिमा गौतम (वय १७), सार्थक गौतम (वय१३) ( सर्व रा. पुणे) अशी मयत लोकांची नवे आहे. तर इतर १६ प्रवासी सुखरूप आहे.

