• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोहसिन शेख टोळीविरुद्ध मोक्का कारवाई…

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग | तासगावातील सावकाराला बेंगलोरमध्ये अटक : तासगाव पोलिसांची धडक कामगिरी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईत मोहसिन शेख याच्यासह साथीदाराविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही 88 वी कारवाई आहे.

त्यामुळे सराईत टोळ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मोबा उर्फ मोहसीन शेख ( टोळी प्रमुख ) आणि मोईन काळु शेख अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

मोबा उर्फ मोहसीन शेख ( टोळी प्रमुख) याच्यासह मोईन शेखने खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, धाक दाखवून खंडणीचे गुन्हे केले आहेत. येरवडा परीसरात दहशत निर्माण करून, आर्थिक फायदा मिळविला होता. त्यांच्याविरूद्ध मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फतीने अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला. टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, एपीआय महेश लामखडे, उपनिरीक्षक डोंबाळे, सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांनी केली.पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले. गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्कानुसार 88 व्या टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सेक्स वर्कर तरुणीची दोन गिऱ्हाईकांकडून डोक्यात पाटा-वरवंटा घालून हत्या

Next Post

उमदी पोलिसांत तिघांनी अपहरण केल्याची तक्रार ; गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

उमदी पोलिसांत तिघांनी अपहरण केल्याची तक्रार ; गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group