• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सेक्स वर्कर तरुणीची दोन गिऱ्हाईकांकडून डोक्यात पाटा-वरवंटा घालून हत्या

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग | सेक्स वर्कर तरुणीची दोन गिऱ्हाईकांकडून डोक्यात पाटा-वरवंटा घालून हत्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गिऱ्हाईक बनून आलेल्या दोन जणांनी एका सेक्स वर्कर महिलेची डोक्यात पाटा वरवंटा घालून निर्घुण हत्या केली. दोन जण या महिलेकडे शय्यासोबत करण्यासाठी आले होते.

मात्र काही कारणामुळे वाद झाल्याने त्यांनी तिची निर्घृण हत्या केली. एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा व्यक्ती फरार आहे. माही असे हत्या करण्यात आलेल्या सेक्स वर्कर तरुणीचे नाव आहे. हनुमान टेकडी येथे ही घटना घडली आहे.

मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी परिसरातील एका खोलीत या महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेच्या डोक्यात दगडी पाटा घातल्याने महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. मृत महिला गेल्या ६ ते ७ महिन्यापासून या परिसरात रहात होती.

महिला येथे वेश्या व्यवसाय करत होती. तिच्याकडे शय्यासोबत करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तिची हत्या केली. दोन जण हनुमान टेकडी परिसरातील दोन महिलांकडे संपूर्ण रात्रभरासाठी शय्यासोबत करण्यासाठी आले होते. या दोघांनी एका महिलेच्या डोक्यात पाटा वरवंटा घालून हत्या केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर परिसरातील महिलांनी आरडाओरड करून नागरिकांना एकत्र केले व हत्या करून पळून गेलेल्या व्यक्तीच्या दुसऱ्या साथीदारास पकडून ठेवले. त्यानंतर स्थानिक भिवंडी शहर ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याने या व्यक्तीस ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. दुसऱ्या फरारर आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | अजित पवार गटाचे पदाधिकारी निवडले : पहा कोणाला मिळाली संधी..!

Next Post

मोहसिन शेख टोळीविरुद्ध मोक्का कारवाई…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | तासगावातील सावकाराला बेंगलोरमध्ये अटक : तासगाव पोलिसांची धडक कामगिरी.

मोहसिन शेख टोळीविरुद्ध मोक्का कारवाई...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group