• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | अजित पवार गटाचे पदाधिकारी निवडले : पहा कोणाला मिळाली संधी..!

Admin by Admin
November 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | अजित पवार गटाचे पदाधिकारी निवडले : पहा कोणाला मिळाली संधी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अखरे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. जिल्हाध्यक्षपदी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची, तर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. पद्माकर जगदाळे यांची निवड केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटाच्या राष्ट्रवादीच्या निवडी मुंबई येथे बुधवारी जाहीर केल्या. यामध्ये त्यांनी वैभव पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जयंत पाटील यांचे अनेक वर्षे कट्टर समर्थक असलेले प्रा. पद्माकर जगदाळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचा सत्कारही करण्यात आला.

सांगली जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा जिल्हा असल्याने याठिकाणी पक्ष फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू होता. मात्र, त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पदाधिकारी निवडी रेंगाळल्या होत्या. बुधवारी त्यांनी त्यांचेच एकेकाळचे सहकारी असलेल्या लोकांना एकत्र करून पदे दिली. पक्षवाढीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. मुंबईतील कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मनोज भिसे, अविनाश चोथे, विपुल तारळेकर आदी उपस्थित होते.

अजित पवार गटाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असून, या पदाधिकाऱ्यांमार्फत शहर, जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या महिनाभरात अन्य सेलच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले.

Previous Post

प्रत्येक बसस्थानकावर आता महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

Next Post

ब्रेकिंग | सेक्स वर्कर तरुणीची दोन गिऱ्हाईकांकडून डोक्यात पाटा-वरवंटा घालून हत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सेक्स वर्कर तरुणीची दोन गिऱ्हाईकांकडून डोक्यात पाटा-वरवंटा घालून हत्या

ब्रेकिंग | सेक्स वर्कर तरुणीची दोन गिऱ्हाईकांकडून डोक्यात पाटा-वरवंटा घालून हत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group