• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुबार नोंदी प्रकरणी चिंचणी मंडळाची दफ्तर तपासणी

तपासणी अधिकारी म्हणून पलूस नायब तहसीलदारांची नियुक्ती

Admin by Admin
November 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोपनीय खबऱ्याने केली होती पोलखोल

कडेगांव:- तालुक्यातील चिंचणी मंडळाची दफ्तर तपासणी करण्याचे आदेश प्रांताधिकारी अजय शिंदे यांनी गुरुवारी दिले आहेत. दुबार नोंदी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे डी एस देशमुख यांचे तक्रारीचे निवेदन प्राप्त झाल्याने प्रांताधिकारी शिंदे यांनी दफ्तर तपासणीसाठी पथक नेमल असून पलूस चे निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मोहिते वडगाव प्रकरण आता निर्णायक वळणावर आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कडेगांव तालुक्यातील काही तलाठ्यांनी बेकायदेशरपणें दुबार नोंदी धरल्या असल्याबाबत सडेतोड वृत्तांकन करीत पोलखोल केली होती.

कडेगांव तालुक्यातील दुबार नोंदी बाबत गोपनीय खबऱ्याने सडेतोड वृत्तांकन करीत पोलखोल केल्यानंतर राष्ट्रवादी चे डी एस देशमुख यांनी निवेदनाद्वारे संपूर्ण प्रकरणात पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती.त्यानंतर या प्रकरणात दफ्तर तपासणी करण्याचे आदेश तत्कालीन प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांनी दिले होते मात्र नेमणूक केलेल्या नायब तहसीलदार यांची बदली झाली व शिवाय प्रांताधिकारी डॉ देशमुख यांचे आकस्मित निधन झाल्याने सदर प्रकरण शांत झालं की काय ? असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र आता या प्रकरणात प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी अजय शिंदे यांनी नवीन आदेश पारित करीत तपासणी साठी एका पथकाची नेमणूक करत पलूस चे निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मोहिते वडगाव येथे तत्कालीन तलाठयाने वादग्रस्त दुबार नोंदी धरल्या अस उघड बोललं जात असताना त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे डी एस देशमुख यांनी पुराव्यांसह तत्कालीन प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. यामध्ये चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती.

आता या प्रकरणी प्रांताधिकारी अजय शिंदे यांनी गुरुवारी एक आदेश पारित करीत पलूस चे निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांची दफ्तर तपासणी करण्याचे कामी पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.आता या प्रकरणात तक्रारदार डी एस देशमुख यांनी दुबार नोंदी बाबत पुरावेच हजर केले आहेत तसेच आणखी काही दुबार नोंदीचे पुरावे खबऱ्याच्या हाती लागले आहेत त्यामुळं आता संपूर्ण दफ्तराची निष्पक्ष तपासणी होणे गरजेचे आहे असे बोललं जात आहे.

Previous Post

Big breaking: मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

Next Post

शिराळ्यात वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिराळ्यात वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार..

शिराळ्यात वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group