• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

BIG BREAKING – ST Commission: महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Admin by Admin
October 12, 2023
in मंत्रालय
0
मुंबईत थांबा, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना फोन, थोड्याच वेळात ‘वर्षा’वर बैठक; राजकीय घडामोडींना वेग
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य जनजाती सल्लागार परिषद पार पडली.

यावेळी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

राज्यासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. या आयोगाच्या अधिनियमाचा मसुदा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून तयार करुन घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सांगण्यात आलं की, राज्यात सध्या १३ जिल्हे अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित आहेत. यातील २३ तालुके पूर्णत: तर ३६ तालुके अंशत: अनुसुचित क्षेत्र आहेत.

यावेळी अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावात नव्याने काही गावांचा समाविष्ट करण्याचं सांगण्यात आलं. पुनर्रचनेच्या प्रस्तावानुसार नव्यानं गावं वाढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.त्यावर सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून आदिवासी विकास मंत्र्यांनी अंतिम आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Previous Post

दफ्तर तपासणीमध्ये कडेगांव तालुक्यातील किती प्रकरणे बाहेर येणार ?

Next Post

तहसीलदारांच्या दप्तर तपासणीमुळे चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणाला गती येणार ? तक्रारदार आणि प्रहार संघटनेचे सुनील सुतार यांच्यामुळे प्रकरणाला दिशा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी : राज्याच्या महसुलवाढी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली महत्वाची बैठक ; विकास कामांसाठी निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा घेतला आढावा.

तहसीलदारांच्या दप्तर तपासणीमुळे चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणाला गती येणार ? तक्रारदार आणि प्रहार संघटनेचे सुनील सुतार यांच्यामुळे प्रकरणाला दिशा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group