• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पवारांचे आभार, मोदींकडे बाजू मांडल्याने राऊतांकडून कृतज्ञता व्यक्त..

Admin by Admin
April 6, 2022
in राजकीय
1 min read
0
पवारांचे आभार, मोदींकडे बाजू मांडल्याने राऊतांकडून कृतज्ञता व्यक्त..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईसंदर्भातदेखील चर्चा केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, या कारवाईवर शरद पवारांनी पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली यासाठी आपण पवारांचे आभारी आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा जो स्वैराचार सुरू आहे त्यावरदेखील शरद पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याचे राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राऊत म्हणाले की, प्रश्न संजय राऊत यांचा नसून, महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांच्या बातमीमध्ये चुकीच्या अन्याय कारवाया राजकीय दबावाखाली सुरू आहेत, असा आरोपदेखील यावेळी राऊत यांनी केला. तसेच पवारांनी माझ्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांकडे त्यांची भूमिका मांडली असेल असे राऊत म्हणाले. पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं महाराष्ट्रात काय चाललंय आणि केंद्रीय तपास यंत्रणा काय करतंय हे सांगण महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, ”इमोशनल ब्लॅकमेल करत किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पैसे लाटले आहेत. आयएनएस विक्रांतचा घोटाळा हा बोफर्स घोटाळ्यापेक्षा जास्त मोठा आहे. माझ्यासारख्या माणसाला संसदेत बोलू दिले जात नाही. परंतु आज शरद पवारांनी राष्ट्रहीताची भूमिका पंतप्रधानांसमोर मांडली. देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा आध्याय सुरु झाला आहे. माझ्यावरील कारवाईनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत.”

जिथे जिथे विरेधी पक्षांची सरकारे आहेत त्या सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व आणि संपूर्ण विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्त्व शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, पवार यांच्या भेटीनंतर तपास यंत्रणेत काही फरक पडेल का? असे विचारल्यावर ते म्हणाले की, नाही पडला तरी कोण घाबरतंय असे राऊत यांनी यावेळी सांगितले. पवारांनी पंतप्रधानासोबत व्यक्त केलेली भूमिका राष्ट्राच्या हिताचीदेखील असल्याचे ते म्हणाले.

Previous Post

वेळ पडली तर रस्त्यावर उतरु- शरद लाड यांचा इशारा

Next Post

सांगली | काँग्रेसचा हातावर हात, शिवसेना सुस्त ,भाजप नेत्यांना वेळ मिळेना..! राष्ट्रवादी आक्रमक..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | काँग्रेसचा हातावर हात, शिवसेना सुस्त ,भाजप नेत्यांना वेळ मिळेना..! राष्ट्रवादी आक्रमक..!

सांगली | काँग्रेसचा हातावर हात, शिवसेना सुस्त ,भाजप नेत्यांना वेळ मिळेना..! राष्ट्रवादी आक्रमक..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group