• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | API MURDER| धक्कादायक खून! धारदार शस्त्राने वार करुन सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा निघृण खून

Admin by Admin
August 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | API MURDER| धक्कादायक खून! धारदार शस्त्राने वार करुन सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा निघृण खून
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला : अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून येऊन धारदार शस्त्राने सपासप वार करुन सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. ही घटना (बुधवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास वासुद येथील केदारवाडी रोडवर घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे (वय-42 रा. वासूद ता. सांगोला) असे खून झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर सूरज हे आपल्या राहत्या घरापासून थोडं दूर शतपावली करण्यासाठी गेले होते. केदारवाडी रस्त्यावर ते शतपावली करत होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी सूरज यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

शतपावली करुन बराचवेळ झाला तरी सूरज घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी सूरज यांचा मृतदेह वासूद – केदारवाडी रोडजवळ आढळून आला.

कुटुंबीयांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सूरज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला.

याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

महसूल उत्पन्न हे जनतेच्या कल्याणासाठी : डॉ. राजा दयानिधी

Next Post

हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक

हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group