• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी, लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार, काय होऊ शकतं?

Admin by Admin
July 26, 2023
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Parliament Monsoon Session 2023 : विरोधी पक्षांची मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे. आता सरकारला त्यांच्याकडे बहुमत आहे, हे संसदेत सिद्ध कराव लागेल. अविश्वास प्रस्तावाची राजकीय चाल का खेळली?

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन रस्ता ते संसदेपर्यंत विरोधी पक्ष आणि मोदी सरकारमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. मागच्या चार दिवसांपासून मान्सून सत्रात गदारोळ सुरु आहे. त्यामुळे कामकाज होत नाहीय. विरोधी पक्षांनी आता मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन मोदी सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारला त्यांच्याकडे बहुमत आहे, हे संसदेत सिद्ध कराव लागेल.

मोदी सरकार विरोधात आणलेला हा अविश्वास प्रस्ताव टिकणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र, तरीही बहुमतात असलेल्या मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधी पक्षांना काय संदेश द्यायचा आहे?

विरोधी पक्षांची नेमकी मागणी काय?

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, “मणिपूर हिंसाचाराच्या विषयात अविश्वास प्रस्तावाचा आधार घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीय. मोदी सरकार मणिपूर मुद्यावर विरोधी पक्षांची मागणी मान्य करत नाहीय. पीएम मोदींनी संसदेत येऊन वक्तव्य करावं, एवढीच विरोधी पक्षांची मागणी आहे. पण त्यासाठी मोदी तयार नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांनीव अविश्वास प्रस्तावाच पाऊल उचललय. अविश्वास प्रस्ताव स्पीकरने मान्य केलाय”

काय लागू शकतो निकाल?

मणिपूरच्या विषयात अविश्वास प्रस्तावाच भविष्य आणि रिजल्ट आधीपासून निश्चित आहे. लोकसभेत संख्या बळाच्या आधारावर भाजपाची बाजू सरस आहे. भाजपाचे स्वत:चे 301 खासदार आणि मित्रपक्षांचे मिळून एकूण 333 खासदार लोकसभेमध्ये आहेत. विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या 202 आहे. यात INDIA गटातील खासदारांची संख्या 142 आहे. NDA आणि INDIA मध्ये नसलेल्या खासदारांची संख्या 64 आहे. सर्व विरोधी पक्ष एकवटले, तरी अविश्वास प्रस्तावात मोदी सरकार विरोधात यशस्वी होणार नाहीत.

ही चाल का खेळली?

विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे मोदी सरकारला मणिपूर हिंसाचाराच्या मुद्दावर लोकसभेत चर्चा करावीच लागेल. राज्यसभेत विरोधी पक्ष मणिपूरच्या विषयावरुन सातत्याने सरकारला घेरतोय. आता लोकसभेत घेरण्यासाठी अविश्वास प्रस्तावाची चाल खेळली आहे. मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे विरोधी गटाचा प्रस्ताव पडणार हे निश्चित आहे. लिट्मस टेस्ट करायची आहे का?

अविश्वास प्रस्तावाच्या बहाण्याने विरोधी पक्षाला 2024 लोकसभा निवडणुकीआधी आपल्या एकजुटीची लिट्मस टेस्ट करायची आहे का? 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा विरोधात चक्रव्यूह रचण्यात विरोधी पक्ष गुंतले आहेत. 26 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन INDIA इंडियन नॅशनल डेवलपमेंटल इनक्लूसिव अलायंस स्थापन केली आहे.

Previous Post

कंटेनरला पाठीमागून आयशर ट्रकची धडक…चालकाचा जागीच मृत्यू

Next Post

पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group