• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीत सराईत गुन्हेगार सच्चा उर्फ सचिन टारझनवर खुनी हल्ला : उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Admin by Admin
July 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाड पोलिसांकडून दैनंदिन पेट्रोलिंग ; गुन्हेगारांच्यात भिती तर नागरिकांत समाधान..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी / सांगलीतील बळवलेली गुन्हेगारी पंधरा-वीस दिवसात शांत होताच पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत असणारा गुंड सच्या उर्फ सचिन टारझन याच्यावरच आज (सोमवारी) सकाळी जीवघेणा हल्ला झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

सचिन टारझन याच्यावर आज सकाळी ७:०० च्या सुमारास धारदार शस्त्राने अहील्यानगर परिसरात खुनी हल्ला करण्यात आला. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सच्या टारझन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील रेड यादीतील गुंड आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आहे.आज सकाळी सातच्या सुमारास काही अज्ञात तरुण अचानक त्याच्या घरात घुसले. त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. काही मिनिटातच हल्ला करून ते परागंदा झाले. गंभीर जखमी अवस्थेत सच्या टारझन याला सांगलीच्या पद्मभूषण वसंतरावदादा पाटील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.

सांगलीत एका पक्षाच्या कार्यकर्त्यावरती गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यात सचिन टारझनचा सहभाग होता अशी सर्वत्र चर्चा होती. पण पोलिस तपासात तसे निष्पन्न झाले नाही. सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान सच्या टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Previous Post

सांगली | राजकारण्यांनाही गंडा : वर्षात दुप्पट रक्कमेच्या अमिषाने ५५ लाखांना गंडा : तिघांवर गुन्हा : प्रारंभी गुंतवणूकदारांना १५ लाखांचा परतावा

Next Post

कडेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार ; निवडणूक खर्चासाठी आलेल्या निधीत अफरातफर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अवैध वाळू वाहतूक करणारं डम्पर सोडवण्यासाठी तलाठयाची तहसीलदारांबरोबर हुज्जत?

कडेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार ; निवडणूक खर्चासाठी आलेल्या निधीत अफरातफर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group