• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

72 तास रेस्क्यू ऑपरेशन… 27 जणांचा मृत्यू… 78 लोक अजूनही गायब; इर्शाळवाडीतील माता बहिणींचे अश्रू थांबता थांबेना

इर्शाळवाडीत एकूण 43 घरे होते. या गावातील लोकसंख्या 229 होती. त्यातील 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून 78 बेपत्ता आहेत. हे लोक ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे.

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
72 तास रेस्क्यू ऑपरेशन… 27 जणांचा मृत्यू… 78 लोक अजूनही गायब; इर्शाळवाडीतील माता बहिणींचे अश्रू थांबता थांबेना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खालापूर | 23 जुलै 2023 : इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. गेल्या 72 तासांपासून एनडीआरएफची टीम ढिगारे उपसण्याचं काम करत आहेत. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 78 लोक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. आपल्या घरातील लोक सापडत नसल्याने येथील ग्रामस्थांचे रडून रडून हाल झाले आहेत. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांचा शोध घेताना दिसत आहे. पाऊस, चिखल आणि अपुऱ्या सुविधांमुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अजून आठ दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इर्शाळगड दुर्घटनेतील 119 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आलं आहे. अजूनही 78 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या सर्वच्या सर्व 78 जणांचा आजही शोध घेतला जाणार आहे. अजून आठ दिवस ही शोध मोहीम सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्च ऑपरेशन किती दिवस सुरू ठेवायचं? सुरू ठेवायचं की नाही हे जिल्हा प्रशासन ठरवेल. त्यांचे आदेश येईपर्यंत आम्ही आमचं काम सुरूच ठेवू, असं एनडीआरएफने म्हटलं आहे. इर्शाळवाडीत गेल्या तीन दिवसांपासून एनडीआरएफच्या चार टीम तळ ठोकून आहेत. दरम्यान, ज्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत, त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

बाहेरच्या लोकांना मज्जाव..

इर्शाळवाडीत युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पाऊस, चिखल, चिंचोळा रस्ता आणि वाहने नेता येत नसल्याने या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे या परिसरात विनाकारण गर्दी होऊ नये, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बाहेरचे लोक, पर्यटक आणि ट्रॅकरला या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त प्रशासकीय यंत्रणांशी संबंधित लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

229 लोकसंख्येचं गाव..

इर्शाळवाडीत एकूण 43 घरे होते. या गावातील लोकसंख्या 229 होती. त्यातील 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून 78 बेपत्ता आहेत. हे लोक ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत, ते डोंगराच्या खाली आणता येत नाहीये. कारण मृतदेह खाली आणण्याची व्यवस्थाच नाहीये. वरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनाही आपल्या नातेवाईकांचं शेवटचं दर्शन घेता येत नाहीये.

Previous Post

वाहतूक शाखेतील ‘त्या’ सहायक फौजदाराचे तडकाफडकी निलंबन

Next Post

सांगलीत महिला संघटना करणार सोमवारी निदर्शने ; मणिपूर प्रकरणी महिला संघटनांचा निर्णय

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत महिला संघटना करणार सोमवारी निदर्शने ; मणिपूर प्रकरणी महिला संघटनांचा निर्णय

सांगलीत महिला संघटना करणार सोमवारी निदर्शने ; मणिपूर प्रकरणी महिला संघटनांचा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group