• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राजकारण्यांनो! मतांसाठी मातंग समाजाचा आणखी किती वर्षे वापर करणार? राज्यसभेवर संधी द्या अन्यथा राजकीय उलथापालथ अटळ!

कारण- राजकारण/ श्री.संकेतराज बने (लेखक हे राजकीय विश्लेषक आहेत)

Admin by Admin
April 3, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
राजकारण्यांनो! मतांसाठी मातंग समाजाचा आणखी किती वर्षे वापर करणार? राज्यसभेवर संधी द्या अन्यथा राजकीय उलथापालथ अटळ!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अनुसुचित जाती जमातीमध्ये प्रखर हिंदुत्ववादी म्हणून मातंग समाजाची ओळख आहे. परंतू महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजतागायत या समाजाला ना राज्यसभेवर ना विधान परिषदेवर संधी दिली गेली.

त्यामुळे राजकारणी मंडळी केवळ मतांसाठी या समाजाचा आणखी किती वर्षे वापर करणार आहेत, असा सवाल मातंग समाजातल्या तरुण, होतकरु आणि उच्चशिक्षित युवक-युवतींमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान, राज्यसभेच्या काही जागा लवकरच रिक्त होणार आहेत.

त्यापैकी राज्यसभेच्या एका जागेवर या समाजातल्या कोणा एका व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा या समाजातल्या सर्वच घटकांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी कालखंडात या समाजाला संधी मिळाली नाही तर राजकीय उलथापालथ अटळ आहे, अशी चर्चा मातंग समाजातल्या नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

मातंग समाज हा काहीसा भाजपशी निगडीत आहे, असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. या समाजातली व्यक्ती स्वत:ची ओळख ‘हिंदू- मातंग’ अशी करुन देते. त्याचबरोबर अनेक हिंदू रितीरिवाज हा समाज पाळतो.

महाराष्ट्राच्या इतिहासात या राज्याच्या स्थापनेपासून मातंग समाज संधीची वाट पाहतो आहे. मात्र या समाजाला विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.

महाराष्ट्राची राजकीय गणितं पाहिली असता २९ जागा राखीव आहेत. मात्र या समाजाचे अवघे दोनच आमदार आहेत, ही मोठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.

या राज्यात काँग्रेसने बराच काळ घालविला. मात्र काँग्रेसच्या कार्यकाळात या समाजाला राज्यसभेवर संधी देण्यात आली नाही आणि विधान परिषदेवरदेखील संधी देण्यात आलेली नाही. काँग्रेसच काय, कुठल्याच पक्षाने संधी दिली नाही.

त्यामुळे भारतीय जनता पक्षानं मातंग समाजाला संधी द्यायला हवी, असा एक चर्चेचा सूर मातंग समाजाच्या नागरिकांमधून ऐकू यायला लागलाय.

वास्तविक पाहता मातंग समाजात तरुण तडफदार आणि निष्कलंक असे तरुण आहेत. यातले बहुतांश युवक भाजपशी संलग्न आहेत. तर काही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यासह विविध पक्षांत आहेत. अगदी नावेच घ्यायची ठरवली तर दिलीप कांबळे, मधुकर कांबळे, अमित गोरखे, अशोक भाऊ लोखंडे, नितीन दिनकर, सुधाकर भालेराव, लक्ष्मणराव ढोबळे,राष्ट्र विकास सेनेचे अमोस मोरे,प्रशांत सदामते,दलित महासंघाचे मधुकर वायदंडे , विष्णुभाऊ कसबे, बिपीन घोरपडे, अभिमन्यू भोसले, मारुती वाडेकर , ऍड.राम चव्हाण, युवराज दाखले, सुदाम धुपे, गणेश वायदंडे या व्यक्तींपैकी एकाला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी, अशी मातंग समाजाची रास्त अशी मागणी आहे.

जे काम साठ सत्तर वर्षांत काँग्रेसने केलं नाही, ते म्हणजे मातंग समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचं काम आजमितीला केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपनं आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं करावं, अशी अपेक्षा मातंग समाजबांधवांमधून केली जात आहे.

Previous Post

“वसंतदादा, राजारामबापू, विष्णुअण्णा, प्रकाशबापू, मदनभाऊ , जयंतराव यांना मिरज पॅटर्न कळाला नाही”.. – राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते

Next Post

कडेगावात उद्या आरपीआय व शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगावात उद्या आरपीआय व शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

कडेगावात उद्या आरपीआय व शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group