Sangli News: सांगली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नालसाह मुल्ला यांची तब्बल आठ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शंभरफुटी रोडजवळ घडली.

या हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.
नालसाह मुल्ला हे त्यांच्या राहत्या घराच्या दारावर बसले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मुल्ला गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांच्या डोक्याला दोन- तीन गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतक नालसाह मुल्ला यांच्यावरही जुने गुन्हे होते, अशी माहिती मिळत आहे. याबाबत सखोल माहिती घेतली जाईल.

