• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगाव पूर्व भागात अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमात

एकाचा जीव गेला तरी महसूल प्रशासन ढिम्म

Admin by Admin
June 19, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कडेगाव पूर्व भागात अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

स्थानिक प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

कडेगाव :- कडेगाव तालुक्यातील कान्हरवाडी येथे अवैध वाळू तस्करीच्या वादातून एकाच खून झाला होता या घटनेस अजून एक महिना सुद्धा उलटला नाही तोपर्यंत वाळू तस्करांनी नदीत पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. इकडं महसूल प्रशासन मात्र ढिम्म असल्याच पहावयास मिळत आहे. स्थानिक प्रशासन अवैध वाळू तस्करीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येरळा काठच्या शेतकऱ्यांनी केला आहे.

अवैध वाळू तस्करीच्या वादातून कान्हरवाडी येथे 3 जून रोजी दोन सख्खा भावांवर खुनी हल्ला झाला होता यात एकाचा मृत्यू झाला होता तर एकजन गंभीर जखमी झाला होता. या घटनेस अजून एक महिना सुद्धा झालेला नसताना अवैध वाळू तस्करांनी येरळा नदीत पुन्हा थैमान घातले आहे आणि याकडे कडेगाव महसूल प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याच शेतकऱ्यांकडून बोललं जातं आहे तर स्थानिक प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील वाडीये रायबाग, आंबेगाव, नेवरी, भिकवडी, तुपेवाडी आणि कान्हरवाडी याठिकाणी अवैध वाळू उपशास मोठ्या प्रमाणात वाव आहे. यामध्ये कान्हरवाडी येथे खून झाल्याने येथे सध्या तरी शांतता आहे.मात्र भिकवडी, नेवरी,आंबेगाव आणि वडीये रायबाग येथून खुलेआम अवैध तस्करी सुरु असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. याबाबत स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली तरी दुर्लक्ष केल जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होतं आहे.

मुरूम तस्करी ही जोमात
कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खेराडे, येतगांव, नेवरी, आंबेगाव आणि वडवे या भागात सध्या मोठ्या प्रमाणात मुरूम तस्करी सुरु आहे. ताकारी तसेच टेंभू योजनेच्या कालव्यावरील तर सध्या सुरु असलेल्या टेंभू च्या बंदिस्त पाईपलाईन पाणी योजनेच्या कामावरील हजारो ब्रास मुरूम, तस्करांनी गायब केला आहे.

Previous Post

सांगलीत खळबळ ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या झाडून हत्या

Next Post

कोणी पुस्तकं देता का कोणी पुस्तकं?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोणी पुस्तकं देता का कोणी पुस्तकं?

कोणी पुस्तकं देता का कोणी पुस्तकं?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group